खेळ

धोनीच्या निवृत्तीची चर्चा कसली करता??; जावेद अख्तर संतापले

नवी दिल्ली |  विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. अन् भारताचं जग्गजेत्ता होण्याचं स्वप्न भंगलं. आणि त्याबरोबरच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची…! याच चर्चांवर जावेद अख्तर चांगलेच संतापले आहेत.

धोनीच्या निवृत्तीची चर्चा कसली करताय? महेंद्रसिंग धोनी हा मधल्या फळीतला एक महान फलंदाज आहे. तितकाच चांगला यष्टीरक्षक आणि विश्वासार्ह खेळाडू आहे, अशा शब्दात अख्तर यांनी टीकाकारांना सुनावलं आहे.

धोनीची खेळाप्रती असणारी समज संघासाठी फायद्याची आहे. हे खुद्द विराट कोहलीला देखील मान्य आहे. धोनीमध्ये आणखी खूप क्रिकेट बाकी आहे. आपण येत्या काळात त्याच्याकडून चांगल्या आणि अफलातून खेळीची अपेक्षा करू, असं अख्तर म्हणाले.

जावेद अख्तर यांनी धोनीच्या खेळावर आणि त्याच्या खिलाडूवृत्तीवर विश्वास व्यक्त करत त्याच्या निवृत्तीची चर्चा इतक्यात करू नका, असं म्हटलंय.

धोनीजी कृपया करून तुम्ही निवृत्ती घेऊ नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारसुद्धा तुम्ही मनात आणू नका, अशी विनंती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली आहे.

दरम्यान, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द धोनीने मला निवृत्ती कधी घ्यायची ते चांगलच कळतं, असं म्हणत चर्चेतील हवा काढून घेतली आहे.

IMPIMP