फेसबुकसोबत करार होताच जिओनं केला हा कारनामा!

मुंबई | फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर याचा जिओला मोठा फायदा झआला आहे. फेसबुकनं जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू 4.62 लाख कोटी रूपये झाली आहे.

कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ 4 कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देखील आहे.

फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स; पुण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

-‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

-डॉक्टरांवर हल्ला केल्यास होणार अजामीनपात्र गुन्हा दाखल; मोदी सरकारचा मोठा निर्णय

-आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील

-चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री