भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड

मुंबई | भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यावर 12 जून 2020 ला दिल्ली मेरठ मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलं? रेल्वे खाते कुणाच्या अखत्यारीत आहे.. केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चीन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण? असे सवाल आव्हाडांनी केंद्र सरकारवा विचारले आहेत.

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चिन्यांनी भारताचे सैनिक मारले पण संरक्षणमंत्र्यांच्या ट्विटमध्ये साधा चीनचा उल्लेख देखील नाही, खरंच जर तुम्हाला वेदना झाल्या असतील तर मग चीनचं नाव का नाही? असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

-शहि…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

-चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी

-पुणेकरांनी शिस्त मोडली; महापौरांनी ‘ही’ गोष्ट बंद करण्याची घोषणा केली!

-पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा