“…तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटलांकडे देईन”

मुंबई : मुख्यमंत्र्यांविरोधात जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला आणि याच्यावर कोर्टाने एकही वेडावाकडा निकाल दिला. तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटील यांच्या हातात देईन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्हाला रात्री 1.30 वाजता कॅबिनेट चालते, सकाळी पहाटे 4 वाजता राष्ट्रपती राजवट उठवलेली चालते. 6.30 ला शपथ चालते. तुम्हाला ज्या कोर्टात जायचंय त्या सुप्रीम कोर्टात जा , जर यावर एकाही कोर्टाने वेडावाकडा निकाल दिला. तर माझा राजीनामा मी चंद्रकांत पाटलांच्या हातात देईन. त्यांनी तो जाऊन राज्यपाल आणि अध्यक्षांना द्यावा. जर असं झालं नाही तर त्यांनी त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदेशीर होता. महापुरूषांबद्दल आम्हाला आदर आहे. पण शपथविधी हा शपथविधी असतो. यावर आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र 4 सदस्य तटस्थ राहिले.

महत्वाच्या बातम्या-