नवी मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी आगामी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा, कॉलेजला 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपट थिएटर्सदेखील बंद करण्यात आली आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते कामालादेखील लागलं आहेत.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात नवी मुंबई येथे होणाऱ्या महापालिका निवडणुका 6 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली.@Awhadspeaks @OfficeofUT@NANA_PATOLE @NCPspeaks pic.twitter.com/K0hOj3zlVK
— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) March 14, 2020
महाराष्ट्र राज्यात काही दिवसांनी होणाऱ्या निवडणूका पुढे ढकला …#coronavirus
मी तशी मागणी केली आहे …@OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/Ga0vmAx3ig— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
–मध्यप्रदेशमध्ये कोणाचं सरकार, 16 मार्चला फैसला
–जैन समाजाचं कौतुकास्पद पाऊल.. महावीर जयंतीचा कार्यक्रम रदद् करून कोरोनाच्या उपचारासाठी निधी
-कोरोनामुळे होतायेत पाळीव प्राणी बेघर
-“ठरलेल्या तारखेसच होणार सर्व बोर्डांच्या व विद्यापीठांच्या परीक्षा”
-षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? फिल्डर बॉल शोधून शोधून दमले