महाराष्ट्र मुंबई

“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”

मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज राष्ट्रवादीला राम राम ठोकत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधलं. त्यावर साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

सचिन अहिर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आणि अनेक वर्षाचे सहकारी आणि पक्षातील बडे नेते होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षातील इतर नेत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सत्ता जर सर्वस्व असेल तर विश्वास, नातं या गोष्टींना काही अर्थ राहिला नाही, असं म्हणत आव्हाडांनी अहिरांवर टीकास्त्र सोडलं. 

शरद पवार साहेबांनी ज्या सचिन अहिरांना लहानपणापासून आधार दिला. वेगवेगळी पदं दिली. गेल्या 20 वर्षात असं कधी झालं नाही की अहिर आलेत आणि साहेबांनी कधी दरवाजा उघडला नाही. मग असं काय झालं की अहिरांनी आमची साथ सोडावी? सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.  

शरद पवारांनी वयाच्या 80 व्या वर्षात हे पाहावं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. जर ते 60 वर्षाचे असते तर त्यांनी पुन्हा एक झंजावात उभा करुन या सर्वांना आडवे पाडले असते. पण साहेबांनाही हृदय आहे. त्याचा विचार अहिरांनी करायला पाहिजे होता, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, सचिन अहिर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, असा विश्वास व्यक्त करणारं ट्वीट आव्हाड यांनी केलं होतं. मात्र पुढच्या काही तासात अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आव्हाडांवर ते ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली.

महत्वाच्या बातम्या-

-इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…

-निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

-साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव

-शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर

IMPIMP