मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं आता बस झालं. त्यांनी आता जरा आवरतं घ्यावं. नाहीतर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत आणि तरीदेखील त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असं पाटील म्हणाले होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी अगोदर संविधान वाचावं. उगाच काहीही बोलू नये. भाजपचा नेत्यानींही अशाप्रकारे शपथ घेतल्या आहेत. त्यामुळे पाटलांनी आता बस करावं. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, आज विधानसभेत महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ क्रिकेटपटूचं धोनीच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य! – https://t.co/lUypg0TLfq @msdhoni @SGanguly99
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“जा ना वाघासारखं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं… लपताय कशाला??” – https://t.co/f6YczZvOyn @NiteshNRane @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“…पण तुम्ही आमच्या आमदारांशी का संपर्क साधताय?” – https://t.co/taNb2H2FXu @Jayant_R_Patil @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019