“…तर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं ते पाप आहे”

मुंबई : 40 हजार कोटी केंद्र सरकारकडून आले असतील तर ते महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी होते. पण महाराष्ट्राच्या नव्या सरकारला धडा शिकवण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे परत पाढवले असतील तर यांनी केलेलं पाप आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी वरिल वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे पाप करतील असं मला वाटत नाही. पण त्यांनी तसं केलं असेल तर महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. फडणवीसांना महाराष्ट्राशी केलेला हा द्रोह आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, हेगडेंचे आरोप खरे असतील तर पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-