हिटलरने जर्मनीत केलं तोच प्रकार भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा मोदी-शहांवर आरोप

पुणे | गुरूवारी पुण्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला.

हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी मोदी आणि शहांवर केला आहे. नागरिकत्व कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी संविधानावरचा सर्वांत मोठा हल्ला आहे, असं आव्हाड म्हणाले.

सीएए कायदा आणून मोदी सरकारने संविधानातील मुल्यांचा भंग केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे आंबेडकर स्वीकारायचे की गोळवळकर?? हे देशानं ठरवायचं आहे, असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, बीडमध्ये सीएए विरोधात बोलताना इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. मला इंदिरा गांधी यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मोदी आणि शहा त्यांच्या जवळही जाऊ शकत नाहीत, असं ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-अरविंद केजरीवालांनी घातलीये भाजप समर्थकांच्या काळजाला साद; व्हीडिओ नक्की बघा…

-छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- फडणवीस

-‘रंग बरसे’ गाण्यावर आमदार प्रशांत गडाखांनी पत्नीसह धरला ताल…!; पाहा व्हीडिओ

-अजूनही देशात नथुराम गोडसेंची मानसिकता जिवंत आहे- नवाब मलिक

-CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं- राष्ट्रपती