उद्धव ठाकरेेंच्या मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका; केली सुरक्षा वाढवण्याची मागणी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्यानं सुरक्षेची मागणी केली आहे. काल झालेल्या मंत्रिमंळाच्या बैठकीत ही मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेतेमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांनी ही मागणी केली आहे.

दाभोळकर, पानसरे यांना मारण्यात आल्यानंतर धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान,  दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येनंतर काही संघटनांनी माझ्या घराची पाहणी केल्याचे पुरावे समोर आले होते. त्यामुळे काही कट्टर संघटनांचे हेतू पाहता आपली सुरक्षा वाढवावी, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-केदार जाधव, मुक्ता बर्वे, धर्मकिर्ती सुमंत यांना पुणे विद्यापीठाचा ‘युवा गौरव पुरस्कार’

-मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्रिमंडळात उपयोग करून घेणार?

-“भारत माझा देश आहे, पण तो पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांचा नाही”

-रजनीकांत भाजपचे पोपट आहेत- पी.चिदंबरम

-भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे; ममता बॅनर्जींची भाजपवर सडकून टीका