…अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”

मुंबई | ठाकरे सरकारच्या काळातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बीडीडी चाळीचा पुर्नविकास प्रकल्प ओळखला जातो. सध्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळीच्या रचनेचा प्रकल्प हातात घेतला आहे.

मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बीडीडी चाळीचा विकास करण्याचा सपाट सरकारनं लावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळीच्या आणखी एका कामाचा शुभारंभ केला आहे.

नायगावमधील दोन बीडीडी चाळीच्या इमारतींसाठीच्या कामाचा शुभारंभ आव्हाड यांनी केला आहे. यावेळी या कार्यक्रमाला राजकीय रंग आला होता. भाजप आमदारांनी आव्हाड यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. परिणामी यावेळी राजकीय मानापमान आणि नाराजी नाट्य रंगलं होतं.

कालिदास कोळंबकर यांनी पत्रकार परिषद घेत यावर नाराजी बोलून दाखवली आहे. परिणामी लगेच मंत्री आव्हाड यांनी कोळंबकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात हा प्रकल्प विकसित करण्यात येणार होता. याच कामाला आव्हाड यांनी गती दिली आहे. मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचयं पण त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे होते, असं कोळंबकर म्हणाले आहेत.

कोळंबकर यांच्या नाराजीवर बाजुला उभ्या असणाऱ्या आव्हाडांनी लगेच साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी.. आता अजून काय पाहिजे?, असं म्हणताच सर्वांना एकदम हसू आलं. सध्या या प्रकाराची राज्यभर चर्चा आहे.

कालिदास कोळंबकर हे माझे जिवलग मित्र आहेत. त्यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक कामं केली आहेत. ते कायम माझ्या सोबत असतात म्हणून त्यांना आमंत्रण देण्याचं विसरलं, असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणारा आणि मुंबईच्या विकासात भर टाकणारा प्रकल्प म्हणून या बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाला ओळखण्यात येतं.

महत्वाच्या बातम्या-

 पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर