आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही; शेलारांच्या वक्तव्यावर आव्हाड आक्रमक

मुंबई | भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आशिष शेलारांना अशी वक्तव्य करणं शोभत नाही. हातात सत्ता नाही म्हणून भाजप नेते अस्वस्थ आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.

दरम्यान, शिवसेना सध्या ऐवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल, असं टीकास्त्र आशिष शेलारांनी शिवसेनेवर सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

-“मी छोट्या आणि मोठ्या भावाच्या कात्रीत सापडलो होतो”

-हिंदुत्वाचं वचन मोडलं जात असेल तर मला असलं हिंदुत्व मला नको- मुख्यमंत्री

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”

-सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही- विक्रम गोखले

-“ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो”