“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”

मुंबई | आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गणेश नाईकांवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. आता पुन्हा एकदा ट्विट करत आव्हाडांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलंय.

मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजून तरी मी शंभर वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा, अशी बोचरी टीका आव्हाडांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील

-“आता आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही”