आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांचं उत्तर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहापूर दौऱ्यावर होते. यावेळी आदिवासी पाड्यावर शरद पवार यांनी आव्हाडांच्या साथीने गरमागरम मटनावर ताव मारला. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आव्हाडांची खिल्ली उडवली होती. त्यांना आव्हाडांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

सोमय्याजी, आदिवासी बांधव आजही मटन खातात. आपण आदिवासींना इतकं गरीब समजता की त्यांच्या आवडीचं जेवण ते पाहुण्यांना खाऊ घालणार नाहीत. आदिवासींच्या गरीबीची कृपया चेष्टा करू नका, असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.

दरम्याम, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांचं आदिवासींच्या झोपडीत जेवण… कोंबडीचा रस्सा, भाकरी आणि ‘बिसलेरीचे पाणी’ वाह भाई वाह.. असं ट्वीट करत सोमय्यांनी आव्हाडांची खिल्ली उडवली होती.

शहापूरच्या आदिवासी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केलं. यासंदर्भातले फोटो आव्हाडांनी ट्वीट केले होते.

 

महत्वाच्या बातम्या-

-सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारचं कौतुक

-“तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली… नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती”

-ते तिचं शरीर आहे… त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते; ट्रोलर्सना प्रियांकाच्या आईचं प्रत्युत्तर

-……म्हणून सुपर ओव्हरच्या ‘सुपर’ विजयानंतरही भारतीय संघाला मोठा दणका!

-मटन खाल्लं म्हणून हिणवणाऱ्या किरीट सोमय्यांना जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक प्रत्युत्तर!