मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतात बुल्ली बाई प्रकरण गाजत आहे. या प्रकरणावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
गिटहबवर सुल्ली डील्स प्रमाणे बुल्ली बाई नावाचा एक ग्रुप काढण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये मुस्लिम महिलांचे आणि महिला पत्रकारांचे फोटो सोशल मीडियावरून गोळा करून त्यांचा ट्विटरवर लिलाव केला जात आहे.
या सर्व प्रकरणाचा जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला आहे. हे अतिशय निंदनीय आहे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुल्ली डील्स, बुल्ली बाईचा वापर करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे. आणि हे अतिशय निंदणीय आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नाही. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हा देश नरसंहाराकडे चालला आहे असे वाटायला लागलंय, असा घणाघात करत आव्हाडांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहबवरील बुल्ली बाई अॅपवरून शेकडो मुस्लिम महिलांचे आणि महिला पत्रकारांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. यावरून जितेंद्र आव्हाडांसह अनेक नेते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीसांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहितीही प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली होती.
#BulliDeals #SulliDeals
चा वापर करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे हे अतिशय निंदनीय आहे. भारतीय संस्कार आणि संस्कृतीमध्ये यांना कुठलेही स्थान नाही. हे धार्मिक राक्षस भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाहीत. हा देश Genocide कडे चालला आहे असे वाटायला लागलंय.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2022
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड
आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर
“सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसतं, जे घडतं ते रक्तरंजित असतं”
CDS जनरल बीपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर
कोरोनाची ‘ही’ दोन नवीन लक्षणं आली समोर; दिसताच लगेच टेस्ट करुन घ्या!