काय रे अक्षय, गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?, आव्हाडांचा चिमटा

मुंबई |  काय रे अक्षय, गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला विचारला आहे. ट्विट करून त्यांनी अक्षयवर निशाणा साधला आहे.

अक्षय कुमारचं सुमारे नऊ वर्षांचं ट्विट खोदून काढत आव्हाडांनी त्या ट्विटला कोट करत त्याच्यावर निशाणा साधला आहे. तू ट्विटर वापरत नाहीस की तू गाड्या वापरणं बंद केलंस? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे, असा चिमटा आव्हाडांनी काढला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारने ट्विट करत सरकारवर टीका केली होती. मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असं ट्विट अक्षयने 16 मे 2011 ला केलं होतं. अक्षयच्या याच ट्विटला आव्हाडांनी कोट केलं आहे.

दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किमती गेले 19 दिवस न चुकता वाढत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा भडका दररोज उडतो आहे. इतिसाहात पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमतीपेक्षा डिझेलच्या किंमत महाग झाली आहे.

 

 

-“बुटक्याने उंटाचा कधीच मुका घेऊ नये; नाहीतर दात पडतात”

-…तर आम्ही एनडीएतून बाहेर पडू, या पक्षाने दिला इशारा