“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा जेम्स लेनच्या (James Laine) पुस्तकावरून वाद सुरू असून, ‘इंडिया टुडे’ने जेम्स लेन यांची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. कांदबरीतील वादग्रस्त उतारा वगळण्यात यावा, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते खूप जुनं झालं. त्यांनी इतिहासाचा बट्ट्याबोळ केला. ते स्वतः कांदबरीकार होते आणि जेम्स लेनही म्हणतोय की मी कांदबरीकार आहे. पुरंदरे यांनी सोलापुरात बोलताना काही अभ्यासक असा उल्लेख केला होता. याचा अर्थ बाबासाहेब पुरंदरे जेम्स लेनला अभ्यासक म्हणायचे. त्याचाही वाद आता नको, असं आव्हाड म्हणाले.

20 वर्षांनंतर ज्यांनी कुणी जेम्स लेनशी संपर्क केला. जो जेम्स लेन 2003 मध्ये आला नाही. 2004 ला आला नाही. 2005 मध्ये आला नाही. 2006 मध्ये आला नाही. भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली. त्यानंतरही तो म्हणाला की, मी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये गेलोच नव्हतो, असं आव्हाड म्हणाले.

2015 मध्ये जेव्हा महाराष्ट्र भूषण देण्यावरून विरोध झाला, तेव्हाही जेम्स लेन म्हणाला नाही. आता हा जेम्स लेन कुठून आला? जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता? गाडलेला राक्षस काढू नका, असंही आव्हाडांनी म्हटलं.

ज्यांनी जेम्स लेन यांची मुलाखत घेतली त्यांना माझं हेच सांगणं आहे की, पुस्तकातील 93 व्या पानावरील चौथा परिच्छेद बघावा. मी हे पुस्तक तोंडपाठ केलंय. पुस्तक सुरुवातीपासून वाचलं, तर एक वाक्य राजेंविरुद्ध आहे. छत्रपतींविरुद्ध आहे. त्यामुळे मुलाखत घेतली, असेल माझी मुलाखत घेणाऱ्यांना इतकीच विनंती आहे की, हे पान जेम्स लेनला पाठवून द्या. त्याला सांगा महाराष्ट्रावर उपकार कर. कांदबरीतील हे महाराष्ट्राविषयी आणि शिवरायांची जगात बदनामी करणारं, त्यांच्या आईंबद्दल शंका निर्माण करणारं काढून टाकावं, असं आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!

“…म्हणून चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रात थांबावं” 

रशियाची युक्रेनियन सैन्याला नवी ऑफर, म्हणाले… 

स्वप्न अधूरंच राहिलं, 18 वर्षीय टॉप टेबल टेनिसपटूचा अपघातात मृत्यू