“फुकट वडापाव खाणाऱ्यांनो तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही”

मुंबई | भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदारांनी ठाण्यातील गजानन वडापाव सेंटरमध्ये कार्यकर्त्यांसह नाष्टा केला होता. परंतु, या सगळ्याचे पैसे न दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

गजानन वडापाव सेंटरच्या मालकांनी आपली कैफियत सोशल मीडियावर मांडली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही, अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते शुक्रवारी उल्हासनगरमध्ये आयोजित करण्यात कार्यक्रमात बोलत होते.

पाहणी दौरा आटोपल्यानंतर मुंबईची ओळख असलेल्या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी भाजप नेत्यांनी ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या गजानन वडापाव सेंटरमध्ये जाऊन नाष्टा केला.

याठिकाणी वडापाव आणि भजी पाववर चांगलाच ताव मारला. यावेळी सर्वजण अगदी खाण्यावर तुटून पडले होते. या सगळ्यांनी मिळून साधारण 200 पेक्षा जास्त वडापाव-भजीपाव खाल्ले. या सगळ्याचे बिल 3950 रुपये इतके झाले. पेटपुजा झाल्यानंतर सर्वजण बिल न देताच याठिकाणहून बाहेर पडले होते.

याचा व्हिडीओ आणि बातम्या वाऱ्यासारखी पसरली. मात्र विरोधकांना आयता मुद्दा मिळू नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी जाऊन बिल भरलं आणि आम्ही बिल दिलं, असं जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ओवेरियन कॅन्सर 

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!