अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राने मुंबईत लोकल सुरू करावी; आव्हाडांची मागणी

मुंबई | मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या, असं ट्विट करत त्यांनी लोकलसेवीसंबंधी ट्विट केलं आहे.

येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-माणुसकी मेली, गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फुटले अश्रूंचे बांध…!

-रायगडला ‘निसर्ग’चा मोठा फटका; पालकमंत्री आदिती तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे ही महत्त्वाची मागणी

-रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याच्या तक्रारी, खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी

-सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले!

-हिंदुस्थान युनिलिव्हरकडून सरकारला मोठी मदत; उद्धव म्हणाले, तुमची मदत कधीच विसरणार नाही!