जितेंद्र आव्हाड मनेका गांधी यांच्या भेटीला; ‘हे’ कारण आलं समोर

मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी भाजप खासदार मनेका गांधी यांची भेट घेतली. प्राण्यांच्या दफनविधीसाठी जागा निश्चित करण्यासंदर्भात ही बैठक निश्चित करण्यात आली होती.

प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करायची आहे. यासंदर्भात मनेका गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा झाली.

मुके प्राणी त्यांची वेदना सांगू शकत नाहीत. त्यामुळे मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तर आव्हाडांच्या मतावर मनेका गांधींचाही सकारात्मक प्रतिसाद होता.

रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राणी यांच्यासाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषण देखील करण्यात येईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

मानव आणि प्राणी एकमेकांसोबत आनंदाने रहावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यासाठी काही खासगी संस्थांचाही सहभाग असणार असल्याची माहिती मनेका गांधी यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मनेका गांधींची भेट घेतल्यावर ट्विट करत भेटीचा फोटो शेअर केला व त्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं.

प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे मुंबईत पूर्वआणि पश्चिम उपनगर भागात जागा उपलब्ध होऊ शकते,अशी माहिती आव्हाडांनी दिली. तर यावर सकारात्मक भूमिका असल्याचंही आव्हाड म्हणाले.

प्राण्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या प्रस्तावासंदर्भात देखील गृहनिर्माण मंत्रालयातर्फे मनेका गांधी यांची भेट घेतल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

पुणे पोलिसांची आणखी एक मोठी करवाई; आश्विन कुमारच्या घरून भलंमोठं घबाड जप्त

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!

Whatsapp लवकरच नवे अपडेट आणण्याच्या तयारीत; ‘हे’ असणार नवे फिचर्स

नितीन गडकरींची मोठी घोषणा, ‘पुढील सहा महिन्यात…’

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”