संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका

मुंबई |  कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले. भाजपच्या याच आंदोलनाचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्रद्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली आहे.

कोोरनासारख्या जागतिक संकटाच्या काळात भाजपने महाविकास आघाडीविरोधात केलेलं आंदोलन जनता कधीही विसरणार नाही आणि जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी देशातील 20 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला. तसंच कोरोनाचं संकट हाताळण्या उद्धव ठाकरे सरकार कमी पडलं असल्याची टीका फडणवीसांनी केली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

-नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

-सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

-आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड