इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

बीड |  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज ‘संविधान बचाव’ या कार्यक्रमात बीडमध्ये बोलत होते.

जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मोदी-शहा यांनी देशावर अघोषित आणीबाणी लादलीये, असं म्हणत असताना त्यांनी इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर भाष्य केलं. यावेळी इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं ते म्हणाले.

आणीबाणीच्या संदर्भात पुष्कळ मत-मतांतर अनेक जणांनी आत्तापर्यंत केली आहेत. पण त्यावेळसची राजकीय परिस्थिती बघता स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या पद्धतीने आणीबाणी लादली त्यावेळेसच्या गोष्टी वेगळ्या होत्या. काही लोकांनी आणीबाणीचं स्वागत केलं तर काहींनी विरोध केला. आव्हाडांनी केलेलं हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण मी त्यांच्याकडे याबद्दलचा खुलासा मागणार आहे, असं काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने आता काँग्रेस विरूद्ध आव्हाड असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातीये.

महत्त्वाच्या बातम्या-

-कुणीही असो गरज पडल्यास चौकशीला बोलावू; चौकशी आयोगाचा फडणवीसांना दणका

-सरपंच निवडीसंदर्भातला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

-देशातील सर्व बॉम्बस्फोटांमागे RSS चा हात आहे- नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील

-मोदी आणि शहा खुनी आहेत…. तसे माझ्याकडे पुरावे- न्या. कोळसे पाटील

“दिल्लीकरांसाठी मी जीवन त्यागलं अन् भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं फार दु:ख वाटतंय”