शरद पवारांकडे ‘तो’ एक दुर्गुण आहे- आव्हाड

पुणे | शरद पवार हे कधीही कोणावर कमरेखालचे वार करत नाहीत. तो त्यांचा दुर्गुण आहे. पण तो उपजत त्यांचा गुण आहे असं वाटतं. कारण राजकारणासाठी किती खालच्या पातळीला जायचं यालाही काही मर्यादा असतात. म्हणून मला त्यांचा तो दुर्गुणही भावतो, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 2-3 दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘बीबीसी मराठी’च्या आयोजित कार्यक्रमात आव्हाड बोलत होते.

कधी काही चुकलं तर पवारसाहेब वडिलांसारखं प्रेमानं सगळ्या गोष्टी समजावतात. प्रसंगी रागवतात, असंही आव्हाडांनी म्हटलं. 

जे सोडून गेले ते गेले. त्यांना जाऊ द्या. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण इतिहासात आयत्यावेळी मला कुणी पवार साहेबांची साथ सोडली, असं कुणी म्हणणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

दरम्यान, मी पवार साहेबांच्या विचारधारेवर प्रेम करतो. मला जटायू व्हायचंय… हनुमान नाही! आणि माझी छाती फाडून मला शरद पवार साहेब माझ्या हृदयात आहेत, असं दाखवायचं नाही, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-