जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. गुरूवारी अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागच्या 20 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. परंतू श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना फोर्सिट रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक नार्वेकर सतत आव्हाडांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात होते. डॉक्टरांनी सांगितलेली उपचाराबाबतची सगळी माहिती नार्वेकर उद्धव यांच्यापर्यंत पोहचवत होते. स्वत: उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनी आव्हाड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसंच थोडासा संयम ठेवा आणि धीर धरा. तुम्ही लवकर बरे व्हाल, असा दिलासा दिला होता.

जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. आजही त्यांनी कोरोनाशी संघर्ष करत त्यावर विजय मिळवून ते पुन्हा एकदा नव्या जोमाने महाराष्ट्रासमोर आले आहेत. आव्हाड कोरोनातून सावरले आहेत हे कळल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यांच्या हितचिंतकांनी आणि आव्हाड यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आज आहे नारद जयंती; जाणून घ्या नारदाच्या जन्माची कथा आणि पूजेचं महत्त्व

-औरंगाबादच्या घटनेनं माझं मन सुन्न झालंय, रोहित पवार यांचं भावूक ट्विट

-औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं

-खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?

-आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी