“महाराष्ट्राला पहिल्यांदा काळ्या केसाचा अध्यक्ष लाभला”

मुंबई : विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडीबाबत सभागृहात त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. अभिनंदन प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.

महाराष्ट्राला पहिल्यांदा काळा केसाचा विधानसभा अध्यक्ष लाभला आहे, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं. यावर सभागृहातून ‘ते डाय करतात’ असा आवाज सदस्यांकडून आला. डाय तर डाय पण काळ्या केसाचा अध्यक्ष आहे, असं मिश्कील वक्तव्य आव्हाडांनी यावर केलं.

आमचा मित्र नाना आता नानासाहेब झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष हिंमतवान आहेत. कोणत्याही विरोधाला ते बळी पडणार नाहीत. कठोर निर्णय घेण्याची त्यांच्यात धमक आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे सभागृहातील सर्व आमदारांनी अभिनंदन केले. नाना पटोले हे शेतकरी पुत्र आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-