मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या आठवड्यात चांगलाच मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जखमी झाले आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या पाच दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका मानला जातो.
पुरोगामी विचारांची वाच्यता करणारे जातीयवाद्यांच्या कळपात जाऊन बसले, असं म्हणत त्यांनी मधुकर पिचड यांनी अपेक्षाभंग केला असल्याचं सांगितलं.
शिवेंद्रराजेंबद्दल आश्चर्य वाटतं, छत्रपतींचे वारसदार असूनही त्यांच्यात लढण्याची जिद्ध नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यामागे सत्तेची लाचारी हे कारण आहे. यांच्यामध्ये वैचारिक अधिष्ठान राहिलेलं नाही. मात्र वैचारिक संघर्षाची लढाई दोन-चार जण इथे तिथे गेले तर संपत नाही, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
-“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”
-मुख्यमंत्री म्हणतात….युतीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्मुला जरा वेगळाच!
-उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
-राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे