मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्या बरोबर चालणे… राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे, जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच, अशा शब्दात आव्हाडांनी सीतारामन यांचा समाचार घेतला.
रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा सवाल अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांना केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस आणि बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या. फक्त गप्पा मारणं हे नाटक नाही का?, अशा शब्दात अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं होतं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील सीतारामन यांचा समाचार घेतला आहे. निर्मला सीतारामजी, राहुल गांधी मजुरांशी फक्त बोलून थांबले नाहीत तर त्यांच्या घरी जाण्याची देखील त्यांनी सोय केली. आम्हाला तुमच्या पक्षासारखी पी.आर. स्टंटची गरज पडत नाही, अशा शब्दात थोरात यांनी अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्या साठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे
जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे
माणुसकी इथे व्यक्त होतेच— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2020
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’
-उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी- उद्योगमंत्री
-खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळला
-“संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या, आदित्य म्हणतो पावसाने बेड भिजतील; असले राज्यकर्ते….?”
-मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल