“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद फोफावल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, अशी बोचरी टीका आव्हाडांनी राज ठाकरेंवर केलीये.

राज ठाकरेंच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, असं म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलन फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे. त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असं एक विकासाचं मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो. असं म्हणत ब्लूप्रिंट देणारे राज ठाकरे आज त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तुमच्या घराच्या बाहेर दलित विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं. त्यांना कसं मारलं गेलं होतं. तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का तुम्हाला ? तुमचं प्रेम, तुमच्या डोक्यातील घृणा हे आजपर्यंत विशिष्ट कृतीतून कायमच दिसलं आहे. तुमची मानसिकता काय आहे हे महाराष्ट्राला उशिरा कळली आहे. शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही. हे गणित ठेवूनच लोक भाषण करतात, अशी टीकाही आव्हाडांनी राज ठाकरेंवर केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; साडेदहा वर्षात पैसे दुप्पट

 शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा