“मोठा भाऊ म्हणून आम्ही आदर करू, पण हे खपवून घेतलं जाणार नाही”

मुंबई | महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेला (Shivsena) उद्देशून अनेक टोले लगावले आहेत. तर आव्हाडांनी भाजपविषयी (BJP) केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही. आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं?, असं ते म्हणालेत.

आम्ही आघाडी (Mahavikas Aghadi) धर्म पाळून विरोधी पक्षातील भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्हीच शत्रुत्व का घ्यायचं?, असा खोचक सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी सेनेला उद्देशून उपस्थित केला आहे.

राजकारणातील (Politics) गणितं कधीही बदलू शकतात, असं सूचक वक्तव्य देखील आव्हाडांनी केलं आहे. ‘मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहे’, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आव्हाड यांनी गणेश नाईक प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांचे कौतुक देखील केले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. हे पाच वर्ष तर आमचे सरकार स्थिर राहिलच, परंतु 2024 मध्ये देखील पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल. तेव्हा देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असं शरद पवार यांनी मला खासगीत सांगितल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

येत्या काळात राज्याती अनेक महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही आघाडी कायम राहिल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जुंपण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

लस न घेण्यासाठी रडून आकाश-पाताळ एक केलं, इंजेक्शन दिसताच महिला शेतात पळत सुटली, पाहा व्हिडीओ 

“सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है”  

राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब