जितेंद्र आव्हाड आपला क्रमांक सांगताना चुकले!

मुंबई : ठाकरे सरकारची बहुमत चाचणी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सुरु आहे. यावेळी हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांना आपल्या जागेवर उभं राहून आकडे म्हणण्यास सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यावेळी चुकलेले पहायला मिळालं.

हंगामी विधानसभा अध्यक्षांनी उभं राहावं आणि आपलं नाव सांगून क्रमांक सांगावेत असं सांगितलं होतं. यावेळी बहुतांश आमदारांचा गोंधळ उडालेला पहायला मिळाला.

जितेंद्र आव्हाड यांच्यापासून या गोंधळाची सुरुवात झाली. त्यांचा क्रमांक 16 होता, मात्र आपलं नाव सांगून जितेंद्र आव्हाड यांनी 20 असा क्रमांक सांगितलं. यावेळी सभागृहात उपस्थित अनेकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी आपली चूक दुरुस्त केली आणि त्यानंतर पुढच्या आमदारांनी आपले क्रमांक सांगण्यास सुरुवात केली, मात्र जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच अनेक आमदार यावेळी चुकलेले पहायला मिळाले.

 

महत्वाच्या बातम्या-