‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन

मुंबई | संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोचक टोले लगावले आहेत. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय.

मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संजय राऊतांच्या कृतीबाबत त्यांना नमन केलंय. तसंच संजय राऊतांकडून माणुसकीचं दर्शन झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही, असं ते म्हणालेत.

वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?, असा सवाल आव्हाड यांनी केलाय.

मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो, असंही जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली” 

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधीचा पहिला व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ 

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं? 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”