“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

अण्णा हजारे यांना खोचक शब्दांत शुभेच्छा देण्याची आव्हाड यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षीही आव्हाड यांनी अशाच खोचक शुभेच्छा दिल्या होत्या.

जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, भारतीय सैन्यदलांत 17 ते 21 वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र यावर विरोधकांकडून टीका केली जातेय. यावरून आव्हाडांनी हे ट्विट करत अण्णा हजारेंवर निशाणा साधलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना 

पोरींचा भर रस्त्यात राडा; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर 

पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता 

मुख्मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले…