महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी-सिंधुदुर्ग

हाच तो खेकडा ज्यानं तिवरे धरण फोडलं!

मुंबई | हाच तो खेकडा ज्यानं तिवरे धरण फोडलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

हाच तो खेकडा ज्याने तिवरे धरण फोडलं, २३ माणसं मारली, धन्य आहे. स्थानिक आमदाराचा भाऊ कॉन्ट्रॅक्टर, का नाही अटक? कोण जबाबदार??? खेकड्याला तरी अटक करा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, आपला कुठं कोण मेला तर आपण सुतक पाळायचं. कुठे गेला माझा संवेदनशील महाराष्ट्र, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट-

 

IMPIMP