“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा

मुंबई | गेले काही दिवस मुंबई उपनगरांत (Mumbai Suburban) एसी लोकलचा (AC Local) मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नेहमीच्या विनाएसी लोकल रद्द करुन त्यांच्या जागी एसी लोकल जादा प्रमाणात सोडल्याने प्रवासी संतप्त आहेत.

मुंबईकरांच्या या संतापाचा रेल्वे प्रशासनाला सामना करावा लागत आहे. ठाणे (Thane) आणि बदलापूर (Badlapur) स्थानकात गेले काही दिवसांमध्ये प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पहायला मिळाला आहे.

त्या मुद्द्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कलवा आणि मुंब्रा विभागातील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर भाष्य केले आहे.

यावेळी आव्हाडांनी या वादावर गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी या वादासाठी रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी आक्रमक प्रवाशांनी ठाणे आणि बदलापूर स्थानकात आंदोलन केले होते, असे आव्हाड म्हणाले.

पण यावेळी या आंदोलनाचा कोणी म्होरक्या नव्हता, याला कोणी नेता नव्हता. या आंदोलनाला कोणतेही नेतृत्व नव्हते. त्यामुळे विनानेतृत्व सुरु झालेले आंदोलन गंभीर ठरु शकते, असा इशारा आव्हाडांनी दिला.

काही दिवसांपूर्वी कळवा कारशेडमधून सुटणारी एक लोकल प्रवाशांनी तासभर अडवून ठेेवली होती. त्यामुळे मोठा खोळंबा झाला होता. ही लोकल थांबविल्याने त्याचा परिणाम वेळापत्रकावर झाला.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. मध्य रेल्वेला सर्वसामान्य प्रशासनाबद्दल ना प्रेम राहिले, ना आपुलकी राहिली आहे. मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेतून येणारे उतपन्न हे देशभरातील सर्वाधीक आहे, असे देखील आव्हाड म्हणाले.

10 एसी लोकलमधून एकूण 5700 लोक प्रवास करतात, तर दुसरीकडे एका विनाएसी (साध्या) लोकलमधून एका वेेळी 2700 लोक जातात. मग उरलेले प्रवासी कोणत्या लोकलने जाणार? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या –

“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”

“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं…” धनजंय मुंडे यांची विधानसभेत बॅटिंग

शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या

टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती