मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं वाद वाढला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. परिणामी या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
ओबीसी आरक्षण हा विषय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या तत्त्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील विषय आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.
आरक्षणाच्या विषयावर राजकारण करणं ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हा विषय न्यायालयात पेंडिग आहे.
ज्या पद्धतीनं बांठिया आयोग काम करतोय आणि डाटा गोळा करतोय, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजूनं लागेल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असं आव्हाड म्हणाले आहेत.
ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करून घेतले असते, असंही यावेळी आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून महाविकास आघाडी सरकार ओबीसी विरोधी असल्याची टीका वारंवार करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल
“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन”
“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”
“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…