Top news महाराष्ट्र मुंबई

‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

Jitendra Awhad and Raj Thackeray

मुंबई | गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून (Raj Thackeray)मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलंय.

महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे (raj thackery) आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का? अधोगती आहे कळत नाही? मुंब्य्राचं नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, या सकाळी लवकर उठून मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असं म्हणत जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा की, माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का?, असं आव्हाड म्हणाले.

जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत, तटकरे लोकसभेत खासदार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचा आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात आणला. तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का राज ठाकरे साहेब, दलित विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्यांना कसं मारलं गेलं होतं, तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का तुम्हाला? असा सवाल आव्हाडांनी राज ठाकरेंना केला.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या  इतका सरडा पण रंग बदलत नाही, की जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही” 

“भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही, म्हणून मनसे त्यांची बी टीम बनलीये” 

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही” 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; साडेदहा वर्षात पैसे दुप्पट