मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोपं आहे. पण आज कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तर डोक्याला हात लावला असता, असं म्हणत अभिनेता जितेंद्र जोशी याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
जितेंद्र जोशीने नुकतच ‘लोकसत्ता’ला मुलाखत दिली आहे. यावेळी जितेंद्र जोशीने राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं प्रशासन जे काही काम करतायेत, त्यावर अनेक जण टीका करत आहेत. मात्र ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले?, असं जितेंद्र जोशीने म्हटलंय.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. मात्र अनेक वेळा त्यांच्यावर टीका करण्यात येते. पण जितेंद्र जोशीने मात्र मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ
-“नक्की खोटं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस?”
-‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
-“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”
-‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर