महाराष्ट्र मुंबई

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?

मुंबई | राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी पक्षात नव्यानं दाखल झालेला जितेश सरडे या तरूणाची निवड झाल्याची माहिती समजत आहे. जितेश सरडे हा शिवव्याख्याता आहे. जितेशची निवड झाल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना कात्रजचा घाट दाखवल्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे कारण अनेकजण या पदासाठी इच्छूक होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शिवव्याख्यातकारांना संधी दिली जात असल्याचं चित्र दिसत आहे. मागे  धर्मवीर संभाजी महाराजांचा जीवन पडद्यावर दाखवत स्वराज्यरक्षक मालिकेतून घराघरात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं.

कोल्हेंना त्यानंतर विधान परिषद बहाल करण्यात आली आणि आता पक्षात नव्याने दाखल झालेला जितेश सरडे हाही शिवव्याख्याता आहे. त्याला राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी मिळाली आहे . जितेश सरडेची वर्णी लावण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रयत्न केले असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेस तरूणांची फळी असलेला पक्ष म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी अनेकजण इच्छूक होते. पण पक्षाने  जितेशवर विश्वास दाखवत त्याची नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

काळजी करू नका, पुण्यातील परिस्थितीवर अजितदादांचं बारकाईनं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवांरानी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…

“…नाहीतर नेहमीप्रमाणेच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल”

विजेच्या झटक्यामुळं होत्याचं नव्हतं झालं; तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींना एकसाथ नेलं

“महिला सुरक्षेवर न थकता भाषणं देणारे नेते कुठं आहेत?, सरकारला केव्हा जाग येणार आहे”