Top news मनोरंजन

कश्मिरी जवानाच्या अनोख्या रॅपवर चक्क जजही थिरकले; पाहा व्हिडीओ

mithun and kashmir jawan e1643291910490
Photo Credit- twitter/@manojyadav4bjp

श्रीनगर | अवघ्या देशात आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या अदम्य शौर्याचं प्रदर्शन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

भारतीय सेनेचे आणि पोलीस सेवेतील जवान आपल्या पराक्रमासोबतच आपल्या अंगभूत कलांसाठी देखील ओळखले जातात. जवानांचा सुरेल आवाजात गाणं म्हणण्याचा व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाला आहे.

हाडं गोठवणारी थंडी असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या जमीनीचं संरक्षण करणं हे सर्वात मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर असताना ते आव्हान हसऱ्या चेहऱ्यानं पेलतात.

सध्या सोशल मीडियावर जम्मू काश्मीर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरला होताना दिसत आहे. पोलीस काॅन्सटेबल जीवन कुमार हे त्या पोलीस जवानाचं नाव आहे.

कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘हुनरबाज: देश की शान’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेले जम्मू-काश्मीर पोलीस हवालदार जीवन कुमार यांनी आपल्या ‘भारत माता की जय जय’ या रॅप गाण्याने जज आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

भारत माता कि जय, जय हिंद या गाण्यावर कुमारनं सुरेख रॅप सादर केला आहे. यासोबतच त्याचा रॅप पाहणारे लोकही सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

शोमधील जज मिथुन चक्रवर्ती, करण जोहर आणि परिणिती चोप्रा तसेच जीवन कुमारच्या अभिनयाने प्रेक्षक दंग झाले आणि सर्वांनी उभे राहून त्याच्या अप्रतिम कलेसाठी टाळ्या वाजवल्या आहेत.

दरम्यान, 2019 साली जम्मू काश्मीर पोलीस दलात दाखल झालेल्या जीवन कुमार यांनी अनेक दहशतवाद्यांना संपवण्याच्या कारवाईत सहभाग घेतला आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”

 “तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”