‘…तर तिसरं महायुद्ध अटळ आहे’; जो बायडन यांचं मोठं वक्तव्य

किव | रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरूच आहे. युद्ध सुरू होऊन 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेन मदतीसाठी नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडे मोठ्या आशेने पाहात आहे.

शिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

आम्ही युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही नाटोच्या प्रत्येक इंच जमिनीचं शक्य तितकं संरक्षण करू. पण युक्रेनमध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात उतरणार नाही. त्यांनी नाटो देशांना असा इशाराही दिला की त्यांनी असं पाऊल उचललं तर ते रशिया आणि नाटो यांच्यात थेट संघर्ष होईल आणि तिसरं महायुद्ध होऊ शकते.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की हे रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिका आणि नाटो देशांना सहकार्य करण्याचं आवाहन करत आहेत.

झेलेन्स्की फोनवर बायडनशी बोलले. झेलेन्स्की म्हणाले की आमच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. यादरम्यान मी युद्धाची परिस्थिती आणि रशियन सैनिकांकडून सामान्य लोकांवर होणारे अत्याचार याबद्दल सांगितलं. रशियाला रोखायचं असेल तर त्यावर आणखी निर्बंध लादले जावेत, हे आमच्या लक्षात आलं, असं ते म्हणाले.

अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी सर्वच बाजुने रशियाची आर्थिक कोंडी केली आहे. रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत.

अमेरिकेने तर रशियामधून होणाऱ्या कच्च्या तेलाची तसेच इतर ऊर्ज साधनाची आयात देखील थांबवली आहे. याचा परिणाम म्हणजे रशियन चलनाच्या मुल्यात घट झाली आहे. मात्र दुसरीकडे याचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Russia Ukraine War: युक्रेनच्या ‘या’ नव्या दाव्यानं रशियाचं टेन्शन वाढलं 

 “आताच बसलोय, परत या”, सोशल मीडियावर आज दिवसभर फक्त ‘या’ व्हिडीओचीच चर्चा

नवरा असो किंवा बाॅयफ्रेंड मुली कधीच सांगत नाहीत ‘हे’ पाच सिक्रेट

8 लाखाच्या आत मिळतीये 7 सीटर आरामदायी कार; Kia Carens सह ‘या’ 4 गाड्यांना जोरदार मागणी

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे होतोय ‘या’ कंपन्यांना फायदा; वाचा सविस्तर