मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षाने बाजूला फेकलं, असा आरोप जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ते बुलडाण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र, ही आघाडी झाल्यानंतर दुधातील माशी बाजूला फेकावी अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षाने आम्हाला बाजूला फेकल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे
मित्र पक्षाला त्यांच्या कृतघ्नतेची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण राज्यभर राजकीय उपद्रव मार्च काढला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे.
औरंगाबाद विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या लढा दरम्यान अनेकांचे प्राण गेले होते. या सर्व शहिदांना मानवंदना देण्यासाठी ते देऊळगाव राजा तालुक्यातील राहेरी पूल या ठिकाणी लॉंग मार्च संघर्ष भूमी याठिकाणी आले होते. यावेळी बुलडाण्यात पत्रकार परिषदे दरम्यान कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारची (MVA ) स्थापना शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत केली. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचे मित्र पक्ष नाराज झाल्याचं वारंवार समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!
शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल
‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा
“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय”
‘तमाशा बनवलाय माझा’, ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ढसा ढसा रडला ‘हा’ नेता, पाहा व्हिडीओ