“जोगेंद्र कवाडेंना मंत्रिपद मिळावं हीच आंबेडकरी जनतेची इच्छा”

मुंबई |  प्रा. जोगेंद्र कवाडे हे गेल्या 21 वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मित्रपक्ष म्हणून आहेत. रिपब्लिन चळवळीतले ते वयोवृद्द आणि अतिशय अनुभवी नेते आहेत. म्हणूनच जोगेंद्र कवाडेंच्या संघर्षाला मान देऊन त्यांना मंत्रिपद मिळावं हीच आंबेडकरी जनतेची इच्छा आहे, असं मत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे यांनी व्यक्त केलं आहे.

प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंना मंत्रिपद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील मंत्रिपद मिळत आहे. तर मग 21 वर्ष सोबत असलेल्या रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कवाडेंना देखील मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीने जर जोगेंद्र कवाडेंना सामाजिक न्यायविकास खातं दिलं तर महाराष्ट्रातल्या तमाम मागासवर्गिय समाजाच्या उत्थानाचं काम झाल्यायाशिवाय राहणार नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि वंचित गोरगरिब-पिडितांपर्यंत जोगेंद्र कवाडे गेल्याशिवाय राहणार नाहीत, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, घटकपक्षांना योग्य न्याय दिला जाईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. मात्र आता कवाडेंना मंत्रिपद देऊन त्यांचा शब्द ते खरा करून दाखवणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-