मुंबई | बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता जॉन अब्राहमने फार कमी वेळात इंडस्ट्रीत नाव कमावलं. आपली एक वेगळी ओळख निर्माण जॉन अब्राहमने केली. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो मात्र सध्या त्याने सोशल मीडियावर धक्कादायक पाऊल उचललं आहे.
जॉन अब्राहमने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आपल्या सर्व पोस्ट डीलीट केल्या आहेत. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जॉनने नेमका हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला आहे. हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तीन दिवसांनंतर म्हणजेच 17 डिसेंबरला जॉन अब्राहमचा वाढदिवस आहे. अशात अचानक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व फोटो डिलिट झाल्यानं चाहतेही हैराण झाले आहेत.
जॉन अब्राहमचं इन्स्टाग्रामवर अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जॉन अब्राहमनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, खरंतर जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत यांचा एक चित्रपट येतोय. ज्याचं नाव आहे ‘अॅटॅक’. या सुपर सोल्जर चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद करणार आहेत.
या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सर्व पोस्ट डिलीट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जॉनकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत हे सर्व चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“पत्नीने सेक्सला नकार दिल्यास दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा पतीला अधिकार”
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या त्या ’12’ आमदारांना जोरका झटका
अँटालिया प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले,’…हे मी आधीच सांगितलं होतं’
महाविकास आघाडीचं सरकार पडेल का?, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट