निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…

नवी दिल्ली | आयपीएलचा ९ वा सामना राजस्थान रॉयल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात पार पडला. हा सामना क्रिकेट विश्वात ऐतिहासिक ठरला. कारण क्रिकेटच्या सामन्यात आपल्याला कधी चांगली फलंदाजी दिसते तर कधी चांगली गोलंदाजी दिसते तर कधी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.

या सर्व गोष्टी सहसा एका सामन्यात पाहायला मिळत नाही. पण कालचा सामना याला अपवाद ठरला. कालच्या सामन्यात क्रीडा रसिकांना दुहेरी रूप पाहायला मिळाले. फलंदाजांनी केलेली उत्तम फटकेबाजी तर दुसऱ्या बाजूला सगळ्यांना आश्चर्यात टाकणारे केलेले क्षेत्ररक्षण.

राजस्थान रॉयलच्या संजू सॅमसन याने शानदार षटकार मारला. पण हा षटकार निकोलस पूरनने चौकाराच्या बाहेर जाऊन उडी मारून अडवला, हे पाहून सर्व क्रीडा रसिक चकितच झाले. हा एक षटकार वाचवण्यासाठी निकोलस पूरनने केलेले क्षेत्ररक्षण पाहून सर्वजण हैराण झाले.

हे क्षेत्ररक्षण पाहून क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांनाही ट्विटरवर येऊन या गोष्टीचे कौतुक करावे लागले. सचिन यांनी ट्विटरवर निकोलस पूरन यांचा क्षेत्ररक्षण करतानाचा फोटो टाकला. त्या ट्विटमध्ये सचिन यांनी लिहिले,”मी माझ्या आयुष्यात पाहिलेला हा सर्वात उत्तम बचाव आहे. अविश्वसनीय.”

त्यातच दुसऱ्या बाजूला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स यांनी आपल्या खेळाडूने केलेला असा प्रयत्न पाहून चकितच झाले. हे पाहून ते आनंदाने टाळी वाजवताना दिसले. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या मुरुगन अश्विन यांच्या ७ व्या षटकाच्या ३ ऱ्या चेंडूवर संजू सॅमसन याने उंच षटकार मारला.

हा षटकार चौकाराच्या बाहेर जात होता. पण निकोलस पूरन याने अगदी सुपरमॅनप्रमाणे वेळेवर येऊन चौकाराच्या बाहेर जाऊन झेल पकडला आणि हवेतच असताना हा चेंडू पुन्हा मैदानात टाकला. या चेंडूवर केवळ एकच धाव मिळाली. निकोलस पूरन यांच्या या शानदार क्षेत्ररक्षणाची चर्चा प्रत्येक जण करत आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने या सामन्यात पहिली फलंदाजी केली. यात त्यांनी २० षटकात २२३ धावा केल्या. ज्यात मयंक अग्रवाल याने १०६ धावा आणि केएल राहुल याने ६९ धावा केल्या. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १८३ धावांची भागीदारी केली.

आयपीएल सामन्यात ओपनिंगला केलेल्या एवढ्या धावांची भागीदारी करणारी ही तिसरी जोडी ठरली आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा मयंक अग्रवाल हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यात त्याने कोहली आणि सेहवाग या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा

लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झालेली ‘ही’ अभिनेत्री म्हणतेय; ‘हनिमूनच्या दिवशी रात्रभर त्यानं…’