राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या निधनाने राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आपल्या वकिलीच्या माध्यमातून लढणारे ते एक कणखर व्यक्तिमत्त्व होते, असं मुख्यमंत्री म्हणाले,

सामाजिक प्रश्नांवर ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणून श्री. देशमुख यांना अवघा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. सुरुवातीपासून वकिली करतांना त्यांनी समाजातील उपेक्षितांचा, कष्टकऱ्यांचा आवाज म्हणूनच काम करणे पसंत केले, असं ते म्हणाले.

त्यांच्या निधनाने विधीक्षेत्राची जशी हानी झाली आहे तसेच सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

-सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार

-अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

-सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार