पुन्हा एकदा जूही चावला दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून जूही चावला ओळखली जाते. नव्वदच्या दशकात आलेल्या अनेक चित्रपटांत जूहीनं आपल्या अभिनय आणि रुपानं राज्य केलं आहे. इश्क, कयामत से कयामत तक, डर, हम है राही प्यार के, येस बॉस, मिस्टर अँड मिसेस खिलाडी असे अनेक हिट चित्रपट जूहीनं दिले आहेत.

मात्र जूहीनं आपल्या चौकटीतून बाहेर येत एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. ही भूमिका होती गुलाब गँग चित्रपटातली. या चित्रपटात जूहीनं पहिल्यांदा खलनायिका साकारली. रुपेरी पडद्यावरची गुणी अभिनेत्री म्हणून मिळवलेल्या प्रतिमेला छेद देत तिनं खलनायिका रंगवण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आणि ते यशस्वी करुनही दाखवलं आहे.

आता पुन्हा एकदा जूही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ५१ वर्षांची जूही ही लवकरच वेब चित्रपटात दिसणार आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला कधीही पाहिलं नसेल अशा भूमिकेत मी दिसणार आहे, असं जुहीने म्हटलं आहे.

ही भूमिका स्वीकारताना मी अनेकदा विचार केला. मला हे जमू शकतं का? हा प्रश्न मला सतावत होता. या भूमिकेत मला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क बसेल हे नक्की, असंही जूहीने म्हटलं आहे. 

दरम्यान, या वेब चित्रपटाबद्दल अधिकची माहिती जूहीनं गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं आहे. मात्र लवकरच ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या –