मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.
मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर विरोधी पक्षनेते जास्तच आक्रमक झाल आहेत. त्याचबरोरबर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात तपास करण्यासाठी जुलियो रिबेरो यांच्याकडे एक मागणी केली होती. मात्र जुलियो रिबेरो यांनी शरद पवार यांचा प्रस्तवा नाकारला आहे.
मला या प्रकरणाचा तपास करायचा नाही. मला याबाबत कोणतीही विचारणा झालेली नाही. शरद पवार यांनी माझ्या नेतृत्वाखाली तपास व्हाव, असं सुचविले होते. परंतू आता मी 92 वर्षाचा आहे. या वयात मी तपास करु शकणार नसल्याचं जुलियो रिबेरो यांनी सांगितलं आहे.
तसेच या वयात माझ्यात तेवढी ताकदही नाही आणि उर्जाही नाही. जरी असती तरी मी या प्रकरणाचा तपास केला नसता. कारण या माध्यमातून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया जुलियो रिबेरो यांनी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे परमबीर सिंह यांना यासगळ्याची माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना या गोष्टीची माहिती सांगायला पाहिजे होती. अशा प्रकारे पत्र लिहिणे हे त्यांचे काम नाही. परमबीर सिंह यांनी हे पत्र आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर लिहिल्याचं जुलियो रिबेरो यांनी सांगितलं.
जुलियो रिबेरो यांना तुम्हाला परमबीर यांच्यावर विश्वास आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नाही मी असे अधिकारी आणि राजकारण्यांवर विश्वास ठेवत नाही, त्यांना खोट बोलायची सवय असते, असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी जुलियो रिबेरोसारख्या चांगल्या अधिकाऱ्यामार्फत झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…
गृहमंञी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांचा मोठा…
सुंदर त्वचेसाठी बटाटा आहे खूपच गुणकारी, जाणून घ्या…