‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ

नवी दिल्ली |  काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजप नाव हटवले आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

 

scindia

 

ज्योतिरादित्य सिंधिया राहुल गांधी आणि एकूणच गांधी घराण्याचे खूपच निकटवर्तीय मानले जायचे. परंतू त्यांनी लोकसभा निवडणुकनंतर काही महिन्यात धक्कादायकरित्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती धरणं पसंत केलं. काँग्रेस सोडण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या ट्विटरबायोमधून काँग्रेस नाव हटवलं होतं. आताही त्यांनी भाजप नाव हटवल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये भाजपऐवजी जनतेचा सेवक आणि क्रिकेटर असं लिहिलं आहे. याविषयी काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी भाजप हे नाव जोडलंच नव्हते. तर काही लोकांचं म्हणणं आहे की सिंधिया यांची भाजपमध्ये घुसमट होत असून त्यांना घरवापसीचे वेध लागले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक माजी आमदारांना पोटनिवडणुकीसाठी अचडणींचा सामना करावा लागत आहे. यावरून देखील ते नाराज असल्याचं बोललं जातंय. एकूणच ट्विटरवरून भाजप हटवणं हा दबावाचा भाग देखील असू शकतो, असा अंदाज देखील राजकीय विश्लेषक लावत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांचं शिवाजीराजांना वंदन

-पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क

-राज्यात आज 2436 जणांना कोरोनाची लागण; पाहा तुमच्या भागात किती?

-भारतात कोरोनामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक

-‘या’ एमआयडीसीमध्ये हजारोंना रोजगारांची संधी; उद्योगमंत्र्यांनी दिली खुशखबर