महाराष्ट्र मुंबई

मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल शिवसेनेत प्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. 

उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना आता जोर आला आहे. कलानी परिवाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतंय. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी यांनी देशात मोदी लाट असतानाही भाजपच्या कुमार आयलानी यांचा भरघोस मतांनी पराभव केला होता. त्यावेळी मोदी लाटेत राष्ट्रावादीच्या एकमेव महिला आमदार निवडून आल्या होत्या.

उल्हासनगर शहरातील कलानी समर्थकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कलानी परिवारातील कोणी निवडणूक लढणार याबाबत चर्चा रंगली. त्यावेळी कलानी समर्थकांच्या मेळाव्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले. 

आमदार ज्योती कलानी या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

-“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

-30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

-मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

-मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

IMPIMP