माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल

नवी दिल्ली |  रं सांगायचं तर माझ्याकडे माझ्या जन्माचा दाखला नाही. या देशात राहणारा मी कोण आहे असं मला विचारल्यास मी काय उत्तर द्यायचं? मी देशाचा नागरिक आहे हे कसं सिद्ध करायचं? मी माझ्या गावी आमच्या स्वत:च्या घरात जन्मलो आहे. माझा जन्म झाला तेव्हा रुग्णालये नव्हती, त्यामुळे माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मग मी काय जीव द्यायचा का?? असा सवाल तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केंद्राला केला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यासारख्या वादग्रस्त कायद्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी राष्ट्रीय स्तरावरील ओळखपत्र योजना राबवावी, असं सल्ला शनिवारी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी केंद्र सरकारला दिला.

एनपीआरअंतर्गत लोकांकडून त्यांच्या पालकांच्या जन्माचे दाखले मागितले जात असल्याचा आरोप राव यांनी केली. आपल्या लहानपणी वयस्कर लोकं कुंडली तयार करायचे अशी आठवणही राव यांनी करुन दिली.

कुंडलीलाच जन्माचा दाखला समजा. त्यावर अधिकृत स्टॅम्प नाहीय. आजही माझ्याकडे कुंडली आहे. ती माझ्या पत्नीकडे आहे. या व्यक्तीरिक्त जन्माची कोणताही कागदपत्रे माझ्याकडे नाहीत. आता माझ्याकडे माझ्याच जन्माचा दाखल नसताना वडिलांच्या जन्माचा दाखला आणायला सांगितल्यास मी जीव दिला पाहिजे का?, असा सवाल राव यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठीत भाषण न केल्यामुळं मला रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर गंभीर आरोप

-गृहखात्यावर नांदगावकरांची तर जलसंपदावर अनिल शिदोरेंची नजर; पाहा मनसेचं शॅडो कॅबीनेट

-अरे बाबांनो तुम्ही आमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवता, पण मतदान करत नाही- राज ठाकरे

-अदित्य ठाकरेंच्या कामावर लक्ष ठेवणार आता ‘राजपुत्र’

-लोकांना आमच्याकडून अपेक्षा पण मतदान मात्र आम्हाला नाही, याचा अर्थ काय??- राज ठाकरे